Jammu Kashmir : लष्कराचे वाहन ७०० फूट खोल दरीत कोसळले; ३ जवानांचा मृत्यू
येथील रामबन जिल्ह्यात रविवारी एक वाहन रस्त्यावरून घसरून ७०० फूट खोल दरीत पडल्याने (Ramban Accident) तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, सकाळी ११.३० वाजता अपघात झाला. राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या लष्कराच्या ताफ्याचा भाग असलेला हा ट्रक अपघातग्रस्त झाला.