Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 3.2 तीव्रता, 5 किमी खोलीवर भूकंपाचे केंद्र
हिमाचल प्रदेश चंबा येथे शनिवारी दुपारी 3.51 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.2 मोजली गेली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार, त्याची भूगर्भातील खोली 5 किलोमीटर होती.