Hidayat Patel : अकोल्यात काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला; प्रकृती गंभीर; राजकीय वैमनस्यातून हल्ल्याचा संशय, आरोपी ताब्यात
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर मोहाळा (ता. अकोट) येथे एका प्रार्थना-स्थळाजवळ जीवघेणा हल्ला झाल्याची घटना मंगळवारी ६ जानेवारीला दुपारी घडली. जीवघेण्या हल्ल्यात पटेल यांच्या पोटावर, मानेवर चाकूने वार केले. हल्ल्यानंतर जखमी अवस्थेतील हिदायत पटेल यांच्यावर अकोट येथे प्राथमिक उपचार करुन त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. अकोला येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती गंभीर आहे.