Good news : चाकरमान्यांसाठी खुशखबर; पीएफवर मिळणार तब्बल 8.25 टक्के व्याजदर, 7 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ
कर्मचारी भविष्य निधी संगठनने (ईपीएफओ) २०२४-२५ वित्त वर्षात कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवरील व्याज दर जैसे थे ठेवले आहेत. अर्थात गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षीही देशातील ७ कोटी कर्मचाऱ्यांना ८.२५% व्याज दिले जाणार आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये ईपीएफओने व्याज दर ८.१५% वरून ८.२५% केला होता. यापूर्वी मार्च २०२२ मध्ये व्याजदरात कपात करून ८.५% वरून ८.१% करण्यात आला होता. गेल्या चार दशकातील हा सर्वात कमी व्याज दर होता.