Girish Mahajan : गिरीश महाजन यांचा आरोप- उद्धव ठाकरेंनी मृतांच्या टाळूवरचे लोणी खायचे काम केले
मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जाऊन बोलावले, कार्यकर्त्यांना कामाला लावावे. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचे काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरेतर लोकांनी तुम्हाला दिले नाही, तुम्ही दगाबाजी करून ते घेतल्याची टीका महाजन यांनी केली आहे.