FDA Launches : तुकाराम मुंढेंची ग्राहकांसाठी मोठी घोषणा; ‘अन्न असो किंवा औषध, फक्त बोला… तक्रार आपोआप तयार होईल’, FDA चे अत्याधुनिक पोर्टल लाँच
भेसळयुक्त अन्नपदार्थ किंवा बनावट आणि निकृष्ट दर्जाच्या औषधांविरोधात आता नागरिकांना तक्रार नोंदवण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार नाही. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित नवीन तक्रार नोंदणी प्रणाली सुरू केली असून, मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलताच तक्रार आपोआप तयार होणार आहे. या सुविधेची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे दिली आहे.