Fadnavis : जयकुमार गोरे प्रकरणामागे सुप्रिया सुळे-रोहित पवारांचा हात; फडणवीस म्हणाले-व्हिडिओ तयार केल्यानंतर NCP नेत्यांना पाठवले
मंत्री जयकुमार गोरे यांना अडकवण्याच्या प्रकरणात शरद पवार यांच्या पक्षाचा मोठा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. या प्रकरणात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे आरोपी तुषार खरात याच्या संपर्कात होते. या प्रकरणाचे विरोधात जे व्हिडिओ तयार केले गेले, ते आधी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांना पाठवण्यात आले असल्याचा मोठा आरोप देखील फडणवीस यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरून राज्यभरात चांगलाच गोंधळ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.