Tirupati : तिरुपती देवस्थानम बनावट तूप प्रकरण; उत्तराखंडमधील कारखान्याने विकले कोट्यवधींचे बनावट तूप; ब्लॅकलिस्ट केल्यानंतरही पुरवठा
आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) ला २५० कोटी रुपयांचे ६८ लाख किलो तूप पुरवून प्रसिद्धीझोतात आलेल्या उत्तराखंडमधील हरिद्वार जिल्ह्यातील भगवानपूर येथील भोले बाबा ऑरगॅनिक डेअरी मिल्क प्रायव्हेट लिमिटेडवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. सीबीआयच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) नेल्लोर न्यायालयात दाखल केलेल्या अहवालानुसार, या डेअरीने कधीही दूध किंवा बटर खरेदी केले नाही, तरीही २०१९ ते २०२४ दरम्यान लाडू प्रसादममध्ये वापरले जाणारे तूप पुरवणे सुरू ठेवले.