Election Commission : निवडणूक आयोगाकडून मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू
मतदार यादीत फेरफार केल्याच्या आरोपांदरम्यान, मतदार ओळखपत्र आधारशी जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार मंगळवारी केंद्रीय गृह सचिव, विधिमंडळ सचिव आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी या विषयावर चर्चा करतील. डुप्लिकेट मतदार ओळखपत्रांच्या मुद्द्यावरून संसदेत अलिकडेच झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात येत आहे.