Eknath Shinde’ : एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला – 30 वर्षांची माया कुठे गेली, लंडनला? पूरग्रस्तांना तुम्ही बिस्किटचा पुडा तरी नेला का?
एकनाथ शिंदे यांनी गोरेगावातील दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत आणि थेट आरोप करत हल्लाबोल केला. त्यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यावरही शिंदेनी जोरदार टीका केली. तुम्ही एक बिस्किटचा पुडा तरी नेला का? असा सवाल शिंदेंनी केला. तसेच एका खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी सर्वच गमावले, अशी टीकाही शिंदे यांनी केली. सावरकरांवर टीका करणाऱ्यांच्या शेजारी बसता. बाळासाहेब असते, तर उलटे टांगून धुरी दिली असती, असा घणाघातही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.