Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाकवर कडक कारवाई करणारे मोदी पहिले पंतप्रधान!
पाकिस्तानवर कडक कारवाई करणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान असल्याचा दावा शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. काँग्रेसने मतपेटीच्या राजकारणामुळे केव्हाच पाक किंवा अतिरेक्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. त्यामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. याऊलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकविरोधात अत्यंत कठोर निर्णय घेत आहेत, असे ते म्हणालेत.