Anjali Damania : अंजली दमानियांना शिरपूर न्यायालयाचे वॉरंट; 23 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश, एकनाथ खडसे मानहानी प्रकरण
माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्याविरोधात 2016 मध्ये निराधार आरोप केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध वॉरंट जारी केले आहे. शिरपूर येथील डॉ. मनोज महाजन यांनी अंजली दमानिया यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 499 (मानहानी) आणि 500 (मानहानीसाठी शिक्षा) अंतर्गत 12 ऑगस्ट 2016 रोजी फिर्याद दाखल केली होती.