• Download App
    Duplicate voters | The Focus India

    Duplicate voters

    Election Commission : विरोधकांचा बोगस मतदानाचा मुद्दा; दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी टूल तयार, राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण

    राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत दुबार मतदारांच्या प्रश्नावर उत्तर दिले आहे. दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार करण्यात आले असल्याचे निवडणूक आयुक्तांनी दिले आहे. तसेच या मतदारांशी संपर्क साधण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    Read more

    Raj Thackeray : निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे संतापले, तळपायाची आग मस्तकात गेली, ते सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं!

    राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. तसेच दुबार मतदार दुबार मतदारांचा प्रश्न सोडवण्यासाठी एक टूल तयार केले आहे. त्यानुसार, ज्या मतदारांची दुबार नावे आहेत, त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरेंनी टीका केली आहे.

    Read more

    Rahul Gandhi : यूपी निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे दावे फेटाळले; कर्नाटक आयोगाने म्हटले- राहुल यांनी प्रतिज्ञापत्र द्यावे

    उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी नवदीप रिनवा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य श्रीवास्तव आणि विशाल सिंग यांची नावे इतर राज्यांसह उत्तर प्रदेशातील वाराणसी आणि लखनऊच्या विधानसभांमध्ये नोंदणीकृत असल्याचा राहुल गांधी यांचा दावा रिनवा यांनी फेटाळून लावला.

    Read more

    Bihar Election Commission : बिहारमध्ये 64 लाख मतदारांची नावे यादीतून वगळणार आयोग, पहिला टप्पा पूर्ण

    बिहारच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाचा (एसआयआर) पहिला टप्पा शुक्रवारी पूर्ण झाला. आतापर्यंत २२ लाख मृत आणि ७ लाख डुप्लिकेट मतदारांची ओळख पटली आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्याच वेळी २४ जूनपासून ३५ लाख मतदार कायमचे स्थलांतरित झाले आहेत किंवा त्यांचा ठावठिकाणा कळलेला नाही. आयोगाने ६४ लाख मतदारांची स्वतंत्र यादी तयार केली आहे. अशा परिस्थितीत एकूण ६४ लाख नावे मतदार मसुदा यादीतून बाहेर पडतील. निवडणूक आयोगाचे उपसंचालक पी. पवन म्हणाले, राज्यात एकूण ७ कोटी ८९ लाख ६९ हजार ८४४ मतदार आहेत. यापैकी ७ कोटी २३ लाखांनी मतमोजणी अर्ज सादर केले आहेत.

    Read more