Trump : ट्रम्प यांची औषधांवर 250% कर लादण्याची धमकी; म्हणाले- औषधे फक्त अमेरिकेतच बनली पाहिजेत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध उत्पादनांवर २५०% कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी सीएनबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की ते सुरुवातीला औषधांवर एक छोटासा कर लादतील, परंतु नंतर तो एक ते दीड वर्षात १५०% आणि नंतर २५०% पर्यंत वाढवतील.