• Download App
    पैशासाठी काहीही अगदी जीव पणाला, तस्करीसाठी महिलेने अवघड जागी लपवून आणले ड्रग्ज|Anything for money, even for life, the woman hid in a private part for smuggling drugs

    पैशासाठी काहीही अगदी जीव पणाला, तस्करीसाठी महिलेने अवघड जागी लपवून आणले ड्रग्ज

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पैशासाठी काहीही अगदी जीव पणाला लावण्याचीही तयारी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महिलेने तस्करी करण्यासाठी आपल्या शरीराच्या अवघड जागी ड्रग्ज लपवून आणले होते. ड्रग्जच्या तब्बल ८० पुड्या या महिलेने आपल्या शरीरात लपविल्या होत्या.Anything for money, even for life, the woman hid in a private part for smuggling drugs

    जयपूर विमानतळावर महिलेची तपासणी केली असता ती ड्रग्जच्या अनेक कॅप्सूल घेऊन आल्याचे आढळले. विमानतळावरील अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून ठेवले होते. ही महिला १९ फेब्रुवारीला सुदानहून जयपूर विमानतळावर पोहोचली.

    विमानतळावरील सतर्क अधिकाऱ्यांना महिलेबद्दल अगोदरच माहिती मिळाली होती की, ती आपल्यासोबत ड्रग्जची मोठी खेप घेऊन येत आहे. विमानतळावर महसूल संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने महिलेला पकडले आणि चौकशी केली. मात्र, महिलेने ड्रग्जबाबत काहीही सांगितले नाही.



    यानंतर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी महिलेची वैद्यकीय चाचणी करण्याची परवानगी घेतली. वैद्यकीय चाचण्यांचे निकाल पाहून डीआरआयचे अधिकारी थक्क झाले. महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये ड्रग्ज लपवून ठेवल्याचे समोर आले. एवढेच नाही तर महिलेच्या पोटात ड्रग्जही लपवले होते. हे ड्रग्ज महिलेने दुबईहून आणल्याचे समोर आले आहे.

    हा प्रकार उघडकीस आल्यानंतर ड्रग्ज काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. एक्स-रे करण्यात आले. त्यात काही पिशव्या होत्या. महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ११ दिवसांनंतर महिलेच्या प्रायव्हेट पार्ट आणि पोटातून सुमारे ८८ कॅप्सूल काढण्यात आले.

    पोटात ३० कॅप्सूल सापडले. ड्रग्जचे द्रवरूपात रूपांतर करून कॅप्सूल बनवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पोटात ठेवलेली एक कॅप्सूल फुटली असती तर महिलेचा मृत्यू झाला असता, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

    Anything for money, even for life, the woman hid in a private part for smuggling drugs

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!