भारतीय संविधानाला कुणापासून धोका??; डॉ. बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते, ते तरी वाचा!!
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून संविधानाला धोका असल्याचा ढोल काँग्रेस, कम्युनिस्ट आणि बाकीच्या सगळ्या विरोधी पक्षांनी पिटला. प्रत्यक्षात असा कुठलाही धोका कुठे निर्माण झाल्याचे किंवा सुप्रीम कोर्टाने तसे ताशेरे ओढल्याचे कुठे दिसले नाही. पण म्हणून विरोधकांनी आपल्या भाषणांमध्ये संविधानाला धोका असल्याचा narrative तयार करणे थांबविले नाही.