• Download App
    devendra fadnavis | The Focus India

    devendra fadnavis

    CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वप्नपूर्तीचा दिवस, 10 वर्षांचे अडथळे पीएम मोदींच्या नेतृत्वात दूर झाले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले. कमळाच्या आकाराच्या डिझाइन असलेल्या या टप्प्यात एक टर्मिनल आणि एक धावपट्टी असून, त्याची क्षमता दरवर्षी दोन कोटी प्रवाशांना हाताळण्याची आहे; येथून नियमित उड्डाणे डिसेंबरमध्ये सुरू होतील. मुंबईचे दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या या प्रकल्पाला शेतकरी नेते डी.बी. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, 10 वर्षांचे अडथळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात दूर झाले आणि हे एअरपोर्ट तयार झाले.

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा: तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर

    पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    Read more

    धोरणात्मक सुधारणांमुळे उद्योगांचीना गरुड भरारी; ग्रीन स्टील निर्मिती प्रोत्साहनासाठी लवकरच नवे धोरण

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली.

    Read more

    आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची नाही दानत, तर काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना दाखवतो!!; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा

    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना मदत करायची दानत नाही, पण काटामारी करून शेतकऱ्यांना फसवताय, तर तुम्हाला दाखवतो, अशा परखड शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा मारी करणाऱ्या साखर कारखान्यांना गंभीर इशारा दिला.

    Read more

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वपूर्ण निर्णय; महाराष्ट्र बनणार ‘ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर’चे हब, उद्योग विभागाचे GCC धोरण 2025 मंजूर

    महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. नागरिकांच्या आरोग्य सेवेपासून ते औद्योगिक विकास, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा, नियोजनातील तांत्रिक प्रगती आणि न्यायव्यवस्थेच्या बळकटीकरणापर्यंत विविध स्तरांवर परिणाम करणारे हे निर्णय आहेत. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमुळे राज्यातील जनजीवन अधिक सक्षम होईल, तसेच प्रशासनाची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

    Read more

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही, पण शेतकऱ्यांच्या दुष्काळी निकषांमधली सगळी मदत देऊ; मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द!!

    ओला दुष्काळ मॅन्युअल मध्ये नाही. पण शेतकऱ्यांना दुष्काळी निकषांमध्ये सगळी मदत देऊ. तिच्यात हयगय होणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिला.

    Read more

    Owaisi : असदुद्दीन ओवैसी म्हणाले- “फक्त पोस्टर नको, मोहम्मद यांचे विचारही मनात ठेवा”

    कोल्हापूर येथे एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी मोठी सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांवर जोरदार टीका केली. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मागितली केंद्राकडून मदत

    विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नवी दिल्ली येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. त्यांना महाराष्ट्रातील […]

    Read more

    CM Fadnavis : NDRF मधून आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरीव मदत द्यावी; मुख्यमंत्र्यांची केंद्रीय गृहमंत्री शहांकडे मागणी

    राज्यात विशेषतः मराठवाड्यात यंदा पावसामुळे धुमाकूळ घातला आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत यंदा अतिवृष्टी झाली असून, त्यात अमाप नुकसान झाले आहे. विशेषतः त्यात जवळपास 84 जणांचा बळीही गेला आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी सरकारकडे हेक्टरी 50 हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने अतिवृष्टी व महापुरात मृत्यू झालेल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज मुंबईत आले असता त्यांच्याकडे देखील मदतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

    Read more

    देवेंद्र फडणवीसांनी काढली राहुल गांधींच्या Gen Z दाव्यातली हवा; भारतीय युवकांवर व्यक्त केला विश्वास!!

    लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना नेपाळ मधल्या Gen Z चे अचानक कौतुक वाटायला लागले. भारतात तशीच “क्रांती” घडवावीशी वाटली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या दाव्यातील हवा काढून टाकली.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री म्हणाले- उद्या निवडणुका लागल्या तरी आम्ही सज्ज, ठाकरे बंधू, आरक्षणाचा तिढा, निवडणुकांवरही भाष्य

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही, यावर चर्चांना उधाण आले असताना फडणवीस यांनी यावर भाष्य करताच चर्चांना नवा आयाम मिळाला आहे. माझ्यावर पक्ष फोडल्याचे आरोप केले जातात. पण जर कोणी म्हटले की, मी ठाकरे बंधूंना एकत्र केले, तर त्याचे श्रेय घेण्यास मला आनंदच वाटेल. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संभाव्य एकत्रीकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका मांडली.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी

    महाराष्ट्रात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे. अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरसह धाराशिव व लातूरच्या दौऱ्यावर होते. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसाठी निर्देश जारी केले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे.

    Read more

    निकष आणि नियमांचा अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत; शेतीच्या बांधावरून मुख्यमंत्र्यांची घोषणा

    मदतीचे निकष आणि नियम यांचा कुठलाही अडथळा न आणता अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी सर्व मदत देऊ, अशा स्पष्ट शब्दांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून मदतीची घोषणा केली

    Read more

    मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अन्य मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागात दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मंत्री संजय शिरसाट आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री आज संपूर्ण राज्याचा दौरा करत असून

    Read more

    31 लाख 64 हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आधीच जीआर, 1829 हजार कोटी पोचलेत, मदतीचा ओघ सुरूच ठेवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द

    महाराष्ट्रात आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 102 % अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील.

    Read more

    अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच थेट मदत!!

    महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत देण्यात येईल, अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली‌

    Read more

    AI, बिग डेटा वापरास प्राधान्य, माहिती तंत्रज्ञानाच्या सक्षमीकरणातून सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या सक्षमीकरणाबाबत सादरीकरण बैठक पार पडली.

    Read more

    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयी सुविधेसाठी नाशिक परिसरातील विमानसेवा सक्षम करा; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सूचना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘महाराष्ट्र एयरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड’च्या संचालक मंडळाची बैठक झाली.

    Read more

    CM Fadnavis : सीएम फडणवीसांनी केली पडळकरांची कानउघाडणी, म्हणाले- आक्रमकपणा दाखवताना भान राखण्याची गरज

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविषयी केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. अनेक राजकीय नेत्यांनी या प्रकरणी पडळकरांच्या विधानाचा निषेध केला आहे. स्वतः शरद पवारांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून आपली नाराजी कळवली. त्यानंतर फडणवीसांनी पडळकरांना फैलावर घेत बोलताना भान राखण्याचा सल्ला दिला. गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या विधानाचे आम्ही केव्हाच समर्थन करणार नाहीत, असे ते म्हणालेत.

    Read more

    देवेंद्र फडणवीसांच्या गोपीचंद पडळकरांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला; राष्ट्रवादीच्या नेत्यांना मिरच्या झोंबल्या

    देवेंद्र फडणवीस यांच्या गोपीचंद पडळकर यांना कानपिचक्या; पण ते मोठे नेते व्हायचाही दिला दाखला!!, असे आज गोपीचंद पडळकर विरुद्ध जयंत पाटील अशा रंगलेल्या सामन्यात घडले.

    Read more

    Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण, आजचा दिवस श्रेयवादाचा नाही, तर आनंदाचा!

    अनेक वर्षांची प्रतीक्षा, तीन पिढ्यांचे स्वप्न आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर बीडच्या भूमीवर रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. बीडमध्ये सुरू झालेली ही रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण करतो असे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना केले.

    Read more

    Devendra Fadnavis, : भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला- केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नाही

    शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच खरे ब्रँड होते. त्यामुळे तुम्ही उगाचच दावा करू नका. केवळ नाव लावून ब्रँड तयार होत नसतो, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव व राज ठाकरेंना लगावला. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, मुंबईत आयोजित केलेल्या ‘विजय संकल्प मेळाव्या’तून भाजपने मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची स्पष्टोक्ती- एकही नकली व्यक्ती ओबीसीमध्ये येणार नाही; नोंदी असणाऱ्यांनाच प्रमाणपत्र मिळणार

    राज्यातील ओबीसी समाजाला कुठलाही धोका नाही. एकही नकली व्यक्ती ओबीसींमध्ये समाविष्ट होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. “नकली म्हणजे जो ओबीसी नाही, तो कधीच या प्रवर्गात समाविष्ट होणार नाही. त्यासाठी सरकारने जारी केलेल्या जीआरमध्ये स्पष्ट तरतूद केली आहे,” असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर उत्तर देताना केला.

    Read more

    Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का? महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न वैजापूरच्या बॅनरवर

    महाराष्ट्रातील 12 मराठा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त देवेंद्र फडणवीसच टार्गेट का?’ हा तमाम महाराष्ट्राच्या मनातील प्रश्न. मराठा आरक्षण आंदोलन सुरू झाल्यावर हा प्रश्न आणखी चर्चिला जात आहे. वैजापूर शहरात एका बॅनरवर नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा पुनरुच्चार- मराठा आरक्षणाचा GR कायदेशीरच; आमचे सरकार असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही

    मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने काढलेला GR पूर्णपणे कायदेशीर असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या जीआर विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मात्र, त्याच बरोबर आमचे सरकार असेपर्यंत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या जीआरला विरोध करणाऱ्या ओबीसी नेत्यांनी आधी जीआर समजून घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.

    Read more