Devendra Fadanvis : मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनबरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुथ्था फाउंडेशन यांच्यामध्ये ‘मूल्यवर्धन 3.0 उपक्रम’ राबविण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने सामंजस्य कराराची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.