Actor Darshan : अभिनेता दर्शनची तुरुंगात विष प्राशनाची विनंती; कोर्टाला म्हटले- सूर्य पाहून बरेच दिवस झाले, हाताला बुरशी; कपड्यातून दुर्गंधी
रेणुकास्वामी हत्याकांडात तुरुंगात असलेला कन्नड अभिनेता दर्शनने तुरुंगात विष देण्याची विनंती केली आहे. दर्शन मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ६४ व्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हजर झाला.