Markandey Katju : महिला वकील संघटनेचा आक्षेप, काटजू म्हणाले होते- महिला वकिलांनी डोळा मारल्यावर त्यांच्या बाजूने निकाल द्यायचो!
सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकील संघटनेने (SCWLA) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांच्या टिप्पण्या धक्कादायक आणि अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. २० ऑगस्ट रोजी काटजू यांनी सोशल मीडियावर लिहिले की, मला डोळा मारणाऱ्या महिला वकिलांच्या बाजूने मी निर्णय दिला.