Prakash Solanke’ : NCP आमदाराचा कार्यकर्त्यांना सल्ला- निवडणुकीत चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं; इच्छुक असून उपयोग नाही, खर्चाची तयारी ठेवा
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जवळ येताच सर्वच पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. अशात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत केलेले एक विधान चांगलेच चर्चेत आले आहे. निवडणूक लढवण्यासाठी नुसता इच्छुक असून उपयोग नाही, तर त्यासाठी तुमच्याकडे किती दारूगोळा आहे याची माहिती द्यावी लागेल. निवडणुकीत शेवटच्या दोन दिवसात चपटी, कोंबडं, बकरं द्यावं लागतं, असे प्रकाश सोळंके म्हणाले.