Shashi Tharoor : शशी थरूर यांनी अर्थव्यवस्थेवरील राहुल गांधींचे विधान फेटाळले; म्हणाले- असं अजिबात नाहीये
काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी राहुल गांधी यांचे भारतीय अर्थव्यवस्था मृतावस्थेत असल्याच्या विधानाचे खंडन केले आहे. शुक्रवारी संसदेच्या आवारात माध्यमांनी थरूर यांना विचारले की, भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत आहे का? यावर त्यांनी उत्तर दिले – नाही, ते अजिबात नाही, सर्वांना माहिती आहे.