Gaurav Gogoi : गोगोई म्हणाले- EC बद्दल जनतेला शंका; सरकार संसदेत चर्चेपासून पळ काढतेय
लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते आणि काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनी रविवारी निवडणूक आयोगाच्या (EC) निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मतदार यादीतील दुरुस्तीवर संसदेत खुली चर्चा व्हावी, अशी विरोधकांची इच्छा आहे, परंतु सरकार ते टाळत आहे.