CM Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा- स्मार्ट मीटर वापरावर ग्राहकांना वीज बिलावर 10% सवलत; 5 वर्षांत वीज दर 24 टक्के घटणार
स्मार्ट मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना दिवसातील वीज वापरावर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच आगामी पाच वर्षांत वीज दर २४ टक्क्यांनी कमी होतील,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यातील ७० टक्के घरगुती ग्राहक (सुमारे १.५ कोटी कुटुंबे) हे दरमहा ० ते १०० युनिट वीज वापरतात. त्यांच्यासाठी नवीन योजना आणली जाईल. याद्वारे ते घरावर सोलार पॅनल बसवून पूर्णपणे वीज बिलमुक्त होतील, असे ते म्हणाले.