डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेत “गमावले” की “ढकलले”??
भारताबरोबर टेरिफ युद्ध सुरू केलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या ट्रूथ सोशल मीडिया अकाउंट वर सत्य बोलले, पण ते अर्धसत्य ठरले!! 5 सप्टेंबर रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वर अमेरिकेने भारत आणि रशिया यांना चीनच्या खोल आणि अंधाऱ्या गर्तेतत गमावले. त्यांचे संबंध तिथे तरी दीर्घकाळ चांगले राहोत, असे लिहिले.