Trump : 33 वर्षांनंतर अण्वस्त्रांची चाचणी करणार अमेरिका; ट्रम्प म्हणाले- चाचणी रशिया आणि चीनच्या बरोबरीची असावी
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण विभागाला (पेंटॅगॉन) तत्काळ अण्वस्त्र चाचणी पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी म्हटले आहे की ही चाचणी चीन आणि रशियाच्या तुलनेत योग्य पातळीवर असावी. अमेरिकेने शेवटची अण्वस्त्र चाचणी १९९२ मध्ये केली होती.