Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचे राहुल गांधींना आव्हान; हिंमत असेल तर माझ्याविरोधात लढा, चितपट केल्याशिवाय राहणार नाही
राहुल गांधी यांनी 2029 ची निवडणूक कामठी विधानसभेतून लढवावी, असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास तयार असून चितपट केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही त्यांनी केला. पिंपरी चिंचवडमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते एका क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले