Britain :परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले- ब्रिटनने खलिस्तान्यांना सूट दिली; जयशंकर यांच्या सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
ब्रिटनच्या दौऱ्यावर असलेले परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षेचे उल्लंघन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी भारताने केली आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ब्रिटेनवर खलिस्तानी शक्तींना उदारता दाखवल्याचा आरोप केला. जयस्वाल म्हणाले की, भारताच्या राजनैतिक कार्यात अडथळा आणणाऱ्यांबद्दल ब्रिटेनने उदासीन वृत्ती दाखवली आहे.