• Download App
    BMC Election | The Focus India

    BMC Election

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर हरकत घेतली. या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत ही परवानगी का मिळाली? का देण्यात आली? कायदा का बदलला? लोकसभा व विधानसभेला अशी मुभा का देण्यात आली नाही? अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे. राज यांनी यावेळी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या ‘पाडू’ मशीनच्या वापरावरही आक्षेप घेतला आहे. आयोगाने कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचे स्पष्ट होते, असे ते म्हणालेत.

    Read more

    राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, 15 हजार 908 उमेदवार रिंगणात

    राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज (ता. 15) मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांकरिता एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत. तसेच पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंमुळे नैतिकता रसातळाला, आजचा घटनाक्रम 2019 च्या घडामोडींचे पीक; भाजपचे टीकास्त्र

    भाजपने शुक्रवारी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांच्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण होऊन नैतिकता थेट रसातळाला गेली, असे भाजपने म्हटले आहे. भाजपच्या या टीकेमुळे राज्यातील राजकारण अधिकच तापले आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना बाहेर काढू; ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांचा घणाघात

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीनंतर राजकीय वातावरण तापले असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेत विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला आहे. मुंबईत महापौर कोणाला करायचं, यासाठी आमची लढाई नाही, तर महायुतीची सत्ता आणून मुंबईकरांसाठी काम करणाऱ्यांना पुन्हा संधी द्यायची आहे, असा ठाम दावा करत फडणवीसांनी भावनिक राजकारणावरही निशाणा साधला. भ्रष्टाचार, विश्वासघात आणि स्वहिताच्या राजकारणाचा ट्रॅक रेकॉर्ड जनता विसरणार नाही, असा इशारा देत त्यांनी आगामी बीएमसी निवडणूक ही केवळ सत्तेची नव्हे, तर विचारांची लढाई असल्याचं स्पष्ट केलं आहे.

    Read more

    Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही; अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेत

    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या युतीचा समाचार घेतला आहे. “काही प्रसारमाध्यमे हे दृश्य असे दाखवत आहेत की जणू रशिया आणि युक्रेनची युती होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, ही युती केवळ स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी दोन पक्ष एकत्र आलेले आहेत. ठाकरे बंधू म्हणजे मुंबई किंवा मराठी नाही,” अशा शब्दांत फडणवीस यांनी राज-उद्धव यांच्या युतीची खिल्ली उडवली.

    Read more

    Eknath Shinde : आपली पोरं सांभाळू शकली नाहीत ते मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंच्या युतीवर टोला

    मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत याची अधिकृत घोषणा केली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीका केली आहे. आता झालेली युती ही सत्तेसाठी असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसेच ज्यांना आपली पोरं सांभाळता आली नाही ते राज्य काय सांभाळणार? असा तिखट सवालही शिंदेंनी उपस्थित केला.

    Read more

    Raj Thackeray : राज ठाकरे म्हणाले- मराठी माणसासाठी मुंबई मनपा ही शेवटची निवडणूक, रात्र वैऱ्याची… गाफील राहिलात तर निवडणूक गेलीच समजा

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. राज ठाकरे म्हणालेत की, मुंबई मनपाच्या निवडणुकीत मतदार यांद्यावर विशेष लक्ष असू द्या. मतदार याद्या तपासून पाहा. मतदार खरा की खोटा? हे तपासून पाहा. रात्र वैऱ्याची आहे… त्यामुळे गाफील राहू नका, आजूबाजूला काय सुरू आहे यावर लक्ष असू द्या.

    Read more

    Sharad Pawar Group : भाजपला फायदा करून देण्याची ‘सुपारी’ घेतली का? काँग्रेसच्या ‘स्वबळा’च्या भूमिकेवर शरद पवार गटाचा सवाल

    आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीमध्ये अचानक मोठा अडथळा निर्माण झाला आहे. मुंबई काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथाला आणि अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी निवडणूक स्वबळावर लढवण्याची एकतर्फी घोषणा करून महाविकास आघाडीतील समन्वयाचा भंग केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे मुंबईतील राजकीय समीकरणे अनपेक्षितपणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याचा थेट फायदा भाजपला होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. शरदचंद्र पवार प्रदेश प्रवक्ते आणि युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

    Read more

    Nitesh Rane : नीतेश राणेंचा काँग्रेस, मनसेला टोला, म्हणाले- काँग्रेस अन् मनसे एकमेकांचा दर्जा ठरवत आहेत, आपण लांबूनच हसलेले बरे

    भाजप आमदार तथा मंत्री नीतेश राणे यांनी मनसेवर टीका करत मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसला खोचक टोला हाणला आहे. काँग्रेस व मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागलेत. त्यामुळे आपण लांबूनच हसलेले बरे, असे ते म्हणालेत. काँग्रेसची बीएमसी स्वबळावर लढवण्याची भूमिका पोकळ असल्याचेही ते म्हणालेत.

    Read more

    Chandrakant Khaire : दोन्ही ठाकरे एकत्र आले तरच मुंबई ताब्यात येईल; चंद्रकांत खैरे यांचे वक्तव्य, बिहार निवडणुकीवरून काँग्रेसला फटकारले

    राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना आणि प्रचाराला वेग येत असतानाच, ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर मोठे विधान केले आहे. दोघे भाऊ एकत्र आले, तर मुंबई महापालिका आपल्या ताब्यात येईल, असे खैरे म्हणालेत. यासोबतच त्यांनी काँग्रेसला फटकारत, आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन केले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

    Read more

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या- काँग्रेसने बिहारमधील ऱ्हासातून बोध घ्यावा, स्वबळाचा निर्णय योग्य की अयोग्य लवकरच कळेल

    काँग्रेसने मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

    Read more

    MLA Prakash Surve : शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान; प्रकाश सुर्वे म्हणाले- मराठी आई, तर उत्तर भारत मावशी; आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरता कामा नये

    मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पेटलेला असतानाच, शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमात बोलताना सुर्वे यांनी वादग्रस्त विधान केले की, मराठी माझी आई आहे, तर उत्तर भारत माझी मावशी आहे. आई मेली तरी चालेल, मात्र मावशी मरायला नाही पाहिजे. या वादग्रस्त विधानामुळे सुर्वे यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाला आयते कोलित दिले आहे, तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे मराठी विरुद्ध अमराठी वादाला आणखी हवा मिळून मोठा वादंग निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

    Read more

    Mumbai BMC : मुंबई महापालिका प्रभाग आरक्षण सोडतीच्या तारखा जाहीर; 11 नोव्हेंबरला सोडत, तर 28 तारखेला अंतिम आरक्षण

    मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतिक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, याच दिवशी मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. यानंतर, 14 नोव्हेंबर 2025 ते 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत

    Read more

    निवडणुकीसाठी तयारीला लागा; मी माझ्या कामाने माझी पोचपावती देतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईत ५०० चौरस फुटाच्या घरांचा मालमत्ता कर माफ केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता दहा महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. या संदर्भात […]

    Read more