Manoj Tiwari : मराठी मुद्द्यावरून मनोज तिवारींचा इशारा- राज ठाकरेंसोबत जाणाऱ्याचे राजकारण संपेल, मराठीची खरी काळजी भाजपलाच
मराठी आणि हिंदी भाषेच्या मुद्द्यावर राज्यात रंगत असलेला वाद आता अधिकच तीव्र होत चालला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमध्ये मराठीचा मुद्दा पुन्हा जोमात उचलून धरल्यानंतर, आता भाजपचे खासदार व लोकप्रिय गायक-अभिनेता मनोज तिवारी यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. ‘राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो महाराष्ट्रात समाप्त होईल,’ असा थेट इशारा त्यांनी दिला असून, मराठी अस्मितेचा खरा आदर भाजपच करत असल्याचा दावा केला आहे.