Bangalore : बंगळुरूत पत्नीचा खून; मृतदेह बॅगेत भरून मुंबईला नेणाऱ्या पतीस साताऱ्यात अटक; रस्त्यातच कीटकनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
पत्नीशी जोरदार भांडण झाल्यानंतर तिचा खून करून मृतदेह बंगळुरूहून कारने मुंबईला नेताना टेक इंजिनिअर पती राकेश राजेंद्र खेडकर (३५) याला सातारा जिल्ह्यात शिरवळ येथे अटक करण्यात आली. पत्नीचा खून केल्यामुळे तणावात असलेल्या राकेशने महाराष्ट्रात कागल गावात आल्यानंतर कीटकनाशक प्राशन केले.