Baba Ramdev : शरबत प्रकरणी हायकोर्टाने बाबा रामदेव यांना अवमान नोटीस बजावली, न्यायालयात हजर राहावे लागेल
दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी बाबा रामदेव यांच्यावर तीव्र टिप्पणी केली. न्यायमूर्ती अमित बन्सल म्हणाले की, रामदेव कोणाच्याही नियंत्रणात नाहीत. ते त्यांच्याच जगात राहतात. बाबा रामदेव यांनी हमदर्द कंपनीच्या रुह अफजाला शरबत जिहाद म्हटले होते.