Pakistan : पाकिस्तानी उपपंतप्रधानांनी अतिरेकी संघटना TRFचे केले समर्थन; पहलगाम हल्ल्यात सहभागाचे पुरावे देण्याचे आव्हान
पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवादी संघटने ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ (TRF) चा बचाव केला आहे संसदेत दिलेल्या निवेदनात डार म्हणाले की, पाकिस्तान टीआरएफला बेकायदेशीर संघटना मानत नाही आणि भारत किंवा अमेरिकेने टीआरएफच्या सहभागाचे ठोस पुरावे सादर करावेत. पहलगाम हल्ल्यात टीआरएफचा सहभाग असल्याचे पुरावे दाखवा. टीआरएफने जबाबदारी घेतल्याचा दावा सिद्ध करा. आम्ही पुराव्याशिवाय आरोप स्वीकारणार नाही.