• Download App
    Ashok Kharat | The Focus India

    Ashok Kharat

    Ashok Kharat : भोंदू खरातचा नवीन कारनामा उघड; भक्तांवर बोगस आयटी छापेमारी करायचा; सेटलमेंटच्या नावाखाली पैसे उकळायचा

    जादू-टोणा आणि तंत्रमंत्राच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात या भोंदूबाबाचे एकामागून एक काळे कारनामे समोर येत आहेत. ‘एसआयटी’च्या तपासात आता खरातचा एक अत्यंत धक्कादायक ‘कांड’ उघड झाला असून, तो आपल्याच श्रीमंत भक्तांना लुटण्यासाठी चक्क ‘बोगस प्राप्तिकर (Income Tax) अधिकारी’ पाठवत असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे, त्याच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी ११ महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातविरुद्ध आणखी 11 महिलांकडून शोषणाची तक्रार; पोलिस आवाहनास प्रतिसाद

    नाशिक मध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणखी ११ महिलांनी पुढे येत खरातविरोधात लैंगिक शोषणाच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. यामुळे एकूण तक्रारींची संख्या आता १९ वर पोहोचली आहे.

    Read more

    Ashok Kharat : अखेर भोंदू अशोक खरातवर मनी लाँड्रिंगचा गुन्हा; ED खरातच्या आर्थिक साम्राज्याच्या मुळाशी जाणार

    अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी भोंदू अशोक खरात विरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला. यामुळे खरातवर दाखल असणाऱ्या गुन्ह्यांची संख्या 13 वर पोहोचली आहे. या गुन्ह्यामुळे भोंदू खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

    Read more

    भोंदू खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांची खैर नाही; बदली नव्हे सेवेतून थेट बडतर्फ करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

    भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांवर बदली नव्हे तर थेट बडतर्फीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी दिला.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातची पत्नी सापडेना; SIT पथकाने माहेरी जाऊन केली चौकशी, लूकआऊट नोटीस जारी

    नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत असतानाच त्याची पत्नी कल्पना खरात फरार असल्याने तपास अधिकच वेगाने सुरू झाला आहे. लूकआऊट नोटीस जारी केल्यानंतर SIT ने थेट माहेरी धडक देत चौकशी केली आणि त्यातून समोर आलेल्या माहितीने तपासाला नवे वळण मिळाले आहे.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या फरार पत्नीच्या विरोधात लुकआऊट नोटीस; देशातील सर्व विमानतळांवर पोलिसांची नजर

    शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक पीडित महिला आता धैर्याने पुढे येऊन त्याच्याविरुद्ध तक्रारी नोंदवत असून, यामध्ये केवळ लैंगिक शोषणाचेच नव्हे तर आर्थिक फसवणुकीचे गंभीर गुन्हेही समोर येत आहेत. खरात हा बेकायदेशीर सावकारीचा व्यवसाय करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, या काळ्या धंद्यात त्याची पत्नी कल्पना खरात हिचादेखील सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.

    Read more

    भोंदू बाबा अशोक खरातची बायको फरारी; पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी

    भोंदूबाबा अशोक खरात याच्या विरोधात गुन्ह्यांची मालिका सुरू असताना अनेक पीडित महिला समोर येत असून केवळ शोषणच नव्हे तर फसवणूक आणि आर्थिक गैव्यवहाराबाबत देखील तक्रारी नोंदवत आहेत. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. अशोक खरात सावकारकीचा व्यवसाय देखील करत असल्याचे उघड झाले असून त्यामध्ये त्याची पत्नी कल्पना ही देखील सामील असल्याचे समोर आले.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू खरातची SIT कडून 5 तास चौकशी; महिला, नेते, सर्वसामान्यांसाठी 4 वेगवेगळे नंबर

    भोंदू अशोक खरातकडे एक नव्हे तर तब्बल 4 मोबाईल क्रमांक असल्याची बाब समोर आली आहे. हे चारही नंबर तो वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्यासाठी वापरत होता. विशेषतः खरातने आपल्या जाळ्यात नाशिकमधील नामवंत डॉक्टरलाही ओढले होते. त्यांच्या मदतीने तो आपल्या जाळ्यात अडकणाऱ्या महिलांना गर्भपाताची औषधे देत असल्याचा संशय आहे. त्यामुळे हे डॉक्टरही आता चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

    Read more

    Ashok Kharat : पोलिसांची अशोक खरातच्या निवासस्थानी धाड; मुलाला घेतले ताब्यात, पत्नी कल्पना फरार

    बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिसांनी आता आपला मोर्चा त्याच्या कुटुंबीयांकडे वळवला आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल असलेली खरातची पत्नी कल्पना खरात हिचा शोध घेण्यासाठी गेलेल्या नाशिक पोलिसांनी, ती मिळून न आल्याने अखेर खरातच्या मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खरात टोळीच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला आहे.

    Read more

    अशोक खरातला पाठबळ कुणाकुणाचे??; बोचरे सवाल केले वंचित बहुजन आघाडीने

    अशोक खरात एकटा प्रकरणात नाही. त्याला कोणाचे तरी पाठबळ होत. ते राजकारणी, पोलिस प्रशासनातील लोक, अधिकारी यांचं पाठबळ आणि संरक्षण असल्याशिवाय असे घडूच शकत नाही.एसआयटी आणि सरकारकडे सगळे व्हिडिओ पुरावे आहेत. यामध्ये मंत्री, खासदार, आमदार, समाजकारणात काम करणारी लोक, नेत्यांच्या कुटुंबातील लोक यांच्या माध्यमातून सुद्धा शोषण झाले आहे. या सगळ्या प्रकरणाचा मूळापासून छडा लावला पाहिजे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली.

    Read more

    Ashok Kharat : महिलांना संमोहित करून भोंदू खरात करायचा लैंगिक शोषण, चाकणकरांसह 11 ट्रस्टींना एसआयटीचे समन्स

    धार्मिक श्रद्धेचा बाजार मांडून महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि कोट्यवधींची माया जमवणारा नराधम अशोक खरात महिलांना गुंगीकारक पेढा आणि कडवट पाणी देऊन संमोहित करायचा आणि नंतर अत्याचार करायचा, असा खळबळजनक आरोप रविवारी (दि. २९) नाशिक जिल्हा न्यायालयात सरकारी पक्षातर्फे करण्यात आला. खरातच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला हजर केले असता, अतिरिक्त मुख्य सत्र न्यायाधीश श्रीमती बराडे यांनी त्याला १ एप्रिलपर्यंत पुन्हा पोलिस कोठडी सुनावली आहे.

    Read more

    Ashok Kharat : भोंदू खरातचे व्हिडिओ व्हायरल करणे पडले महागात; तिघांवर गुन्हा दाखल, पोलिसांचा ग्रुप ॲडमिन आणि नेटकऱ्यांना कडक इशारा

    नाशिकचा कथित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात याच्या लैंगिक शोषणाचे अश्लील व्हिडिओ समाजमाध्यमांवर वाऱ्यासारखे पसरल्यानंतर आता पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. तांत्रिक विधीच्या नावाखाली विवाहित महिला आणि तरुणींचे शोषण करणाऱ्या खरातच्या या कृत्यांचे व्हिडिओ व्हायरल करून पीडितांची ओळख उघड केल्याप्रकरणी पोलिसांनी पहिला गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव आणि बीडमधील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

    Read more

    दैवी अवतार असल्याचे सांगून अशोक खरात कडून महिलांवर बलात्कार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत हादरवणारी माहिती

    आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अशोक खरातने महिलांचे शोषण केले, त्यांच्या योनीत बोट घालत अत्याचार केले, महिलांना तीर्थाच्या नावाखाली लघवी पाजली, अशी हादरवणारी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणात एकूण आठ गुन्हे दाखल असून अशोक खरातला ज्यांनी कुणी मदत केली त्या कुणालाही सोडण्यात येणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रकरणात आणखी तपास सुरू असून त्याची वेळोवेळी माहिती दिली जाईल, असही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    Read more

    फडणवीसांनी अशोक खरातच्या मुसक्या आवळेपर्यंत विरोधक झोपले होते, पण आता त्यांच्यातले “पोपट” बोलायला लागले!!

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरात यांच्या मुसक्या आवळेपर्यंत महाराष्ट्रातले सगळे विरोधक झोपले होते.

    Read more

    Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे 200 कोटींचे ‘बेनामी’ साम्राज्य; पाथर्डीत 150 कोटींची जमीन, आलिशान फार्महाऊस, बेकायदेशीर संपत्ती उघड

    अंकशास्त्राच्या नावाखाली महिलांचे शोषण केल्याच्या आरोपाखाली पोलिस कोठडीत असलेल्या अशोककुमार एकनाथ खरात उर्फ ‘कॅप्टन’ याच्या संपत्तीचे आणि बड्या ओळखींचे धागेदोरे आता वेगाने समोर येत आहेत. त्याच्या आश्रमात अनेक दिग्गज राजकारणी आणि उद्योजकांची नियमित ये-जा असल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट होत असतानाच, आता खरातच्या अफाट मालमत्तेचाही उलगडा झाला आहे.

    Read more