Mukesh Ambani : मुकेश अंबानींची मोठी खेळी; रिलायन्स-मेटा जमनगरमध्ये उभारणार AI डेटा सेंटर, भारताला काय फायदा होणार?
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारतासाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज आणि फेसबुक, इन्स्टाग्राम व व्हॉट्सअॅपची मालक कंपनी मेटा यांनी गुजरातमधील जामनगर येथे अत्याधुनिक AI-सक्षम डेटा सेंटर उभारण्यासाठी भागीदारी जाहीर केली आहे. हा प्रकल्प 168 मेगावॅट क्षमतेचा असेल आणि पुढील दोन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.