Amit Thackeray : अमित ठाकरे म्हणाले- ईव्हीएम नव्हे, तर आपल्याच चुकांनी दारुण पराभव झाला
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएम यंत्रणेला दोष देण्याचे पक्षाचे धोरण असले तरी पराभवासाठी आपणच जबाबदार आहोत असे माझे मत आहे, असे राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी स्पष्ट केले. माहीम विधानसभेला अमित यांचा पराभव झाला होता. मनसेच्या विधानसभा अध्यक्षांची एक बैठक अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात त्यांनी ईव्हीएमविरोधात भूमिका घेण्यास नकार दिल्याचे सूत्रांनी सांगितले.