Sanjay Nirupam : संजय निरुपम म्हणाले- महाविकास आघाडी नव्हे तर ठाकरे विकास आघाडी; दोन्ही पक्ष स्वार्थासाठी एकत्र
महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी एकत्र येत विजयी मेळावा आयोजित केला. या मेळाव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक आले होते. या मेळाव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता संजय निरुपम यांनी देखील ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे. महाविकास आघाडी नव्हे तर आता ठाकरे विकास आघाडी तयार झाले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.