Ajit Pawar : पुण्यात पाऊस अन् कोरोनाबाबत प्रशासन सतर्क, ठोस उपाययोजना करण्यास सुरूवात
पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि सध्याच्या आरोग्यविषयक आव्हानांमुळे जनतेला सावध राहण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. शुक्रवारी रात्री पावसामुळे पुणे शहरातील अनेक भागांमध्ये, विशेषतः हिंजवडीमध्ये पाणी साचले होते, त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.