भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!
काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.
काकांबरोबर खरे खोटे भांडण करून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा आता खरा चटका जाणवतोय.
पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देत राज्य सरकारच्या वतीने पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. 31 हजार 628 कोटी रुपयांचे मोठा पॅकेज आपण शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नागपूर येथे चिंतन शिबिरात बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करताना कोणावर अन्याय होऊ देणार नाही. सारथी बार्टी सगळ्या संस्थांना मदत केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. मागील दोन महिन्यापासून समाजा समाजात तेढ निर्माण केली जातेय, ही पुरोगामी महाराष्ट्राला परवडणारी नाही, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.
अजितदादांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून जी स्वबळाची उबळ आणली, तिच्या मागे ताकद नाही, त्या नागपुरात हव्यात जास्त जागा, पण पुण्यात त्यांना भाजपशी घ्यायचा आहे संघर्षाचा पवित्रा!!, हीच दोन प्रमुख कारणे दिसतायेत. बाकी मराठवाड्यात अजितदादांच्या पक्षाला फारशी संधी नाही. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर वगळता इतर महापालिकांमध्ये फारसे अस्तित्व नाही. जे थोडेफार राजकीय अस्तित्व उरले आहे, ते जिल्हा परिषदांमध्ये, निवडक कारखान्यांमध्येच!!
भाजपच्या सत्तेच्या वळसणीला राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीला स्वबळाची खुमखुमी आली असल्याचे आज दिसून आले. पण त्याच वेळी मागच्या दाराने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशी गुळपीठ जमवायची तयारी केल्याचा डावही समोर आला.
विशेष प्रतिनिधी बीड : Ajit Pawar : बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विशेष लक्ष दिले आहे. […]
विशेष प्रतिनिधी पुणे : Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील केशवनगर-कोंढवा भागात तीन विकासकामांची पाहणी करण्यासाठी आले असताना नागरिकांनी त्यांना वाहतूक समस्येवरून घेरले. […]
अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ समाजातील योग्य व पात्र लाभार्थींपर्यंत पोहोचला पाहिजे,यासाठी विशेष काळजी घेण्यात यावी. या योजनांची अंमलबजावणी पारदर्शक व परिणामकारक पद्धतीने होऊन अधिकाधिक लाभार्थींना त्याचा फायदा व्हावा, यावर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) कामाचा आढावा त्यांनी घेतला.
सरकारकडे योजनांसाठी देण्यास देखील पैसे नाही. लाडकी बहिण योजनेतही पहिल्याच टप्प्यात 26 लाख महिलांना वगळण्यात आले आहे. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. या माध्यमातून त्यांनी नाव न घेता अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इतकेच नाही तर हा भ्रष्टाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वरदहस्ताने झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. या प्रकरणामुळे अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाबाबतीतल्या मागण्या मान्य केल्यानंतर राज्यातील ओबीसी समाज दुखावला गेल्याचे बोलले जात आहे. तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे दाखवून दिली आहे. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके हे सातत्याने पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवारांनीच जरांगे नावाचे भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवले असल्याची टीका त्यांनी शुक्रवारी केली होती. आता पुन्हा एकदा त्यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. या सर्व प्रकरणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले. यासंबंधीचा वाद वाढल्यानंतर अखेर अजित पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण दिले. पोलिस दलातील महिला अधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात सर्वोच्च सन्मान आणि आदर आहे. त्यांच्या कामात हस्तक्षेप करण्याचा माझा उद्देश नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर आता अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील बिनशर्त दिलगिरी व्यक्त केली आहे.
बेकायदा खनन आणि मुरुम उपसा प्रकरणी आपल्या कार्यकर्त्यांना वाचवायला गेलेले पण त्याचवेळी महिला आयपीएस अधिकाऱ्याला दमबाजी करून बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांचे आमदार अमोल मिटकरी अचानक नरमले कसे आणि त्यांना कोणी नरमवले
सोलापूरमध्ये करमाळ्याच्या महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून जोरदार वाद झाला. प्रत्यक्षात, डीएसपी अंजली कृष्णा रस्ते बांधकामासाठी बेकायदेशीर वाळू उत्खननाच्या तक्रारीवर कारवाई करण्यासाठी माढा तालुक्यातील कुर्डू गावात पोहोचल्या होत्या. गावकरी आणि घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट अजित पवारांना कॉल लावला होता. त्यानंतर अजित पवारांनी या महिला अधिकाऱ्याला दम भरल्याचे समोर आले.
विशेष प्रतिनिधी मुंबई : Ajit Pawar सोलापूर जिल्ह्यात महिला आयपीएस अधिकारी डीएसपी अंजली कृष्णा यांच्या सोबत बोलताना अजित पवार यांचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच […]
विशेष प्रतिनिधी सोलापूर : Solapur viral video case : सोलापूर जिल्ह्यातील एका गावात मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन […]
मराठा समाजाला फडणवीस सरकारने ओबीसी मधून आरक्षण दिले नाही त्याचबरोबर सरसकट सगेसोयरे अंमलबजावणी देखील केली नाही. पण हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअर लागू करण्याची मागणी आणि अन्य काही मागण्या सरकारने मान्य केल्या. त्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीतच उपोषण सोडण्याचा आग्रह धरला. पण हे तीनही नेते मुंबईच्या बाहेर आहेत, असे कारण सांगून राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडायला लावले. अखेरीस विखे पाटील यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले.
मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनावरून राज्यात राजकीय वातावरण तापलेले असताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. मराठा आरक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी, ‘ते पुजणीय,आदरणीय, वंदनीय’ असे म्हणत “मला जास्त बोलायला लावू नका,” असा टोला शरद पवारांना लगावला. यामुळे मराठा आरक्षणावरून काका-पुतणे भिडल्याचे पाहायला मिळाले.
मराठा आरक्षणाचा विषय शरद पवारांनी घातला केंद्र सरकारच्या गळ्यात; अजितदादा म्हणाले, मला जायला लावू नका खोलात!! असे काका – पुतण्याचे राजकारण आज रंगले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नगरविकास खात्यावर नाराज असल्याचा दावा केला जात आहे. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे. मुख्यमंत्री नगरविकास खात्यावर नाराज असल्याची माहिती धांदात खोटी आहे, असे ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच रोहित पवार यांना उद्देशून केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. ‘जर भावकीचा विचार केला नसता तर तू आमदार झाला नसतास,’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून आता भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार आपल्याला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राम शिंदे यांनी केला.
काही लोकांना वाटते की आपण लईच मोठे झालो आहोत. सगळ्या महाराष्ट्राचे नेतृत्व आपल्याकडे आले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या पक्षाचे बघावे. आम्ही आमच्या पक्षाचे बघतो. दुसऱ्यांच्या पक्षात नाक खुपसण्याची गरज नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावले आहे. अजित पवार यांचा पक्ष सुनील तटकरे यांनी पक्ष हायजॅक केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. यावरून अजित पवार यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जयंत पाटील म्हणजे देखणे नेतृत्व आणि आम्ही काही देखणे नाही का? कार्यक्रमाला वाळव्यात बोलवायचे आणि आमचीच बिन पाण्याने करायची,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटील यांना लगावला.
आजी म्हणाली, रोहित उगवता तारा; काकाने सांगितले भावकीने पडता पडता वाचविला!!, हे राजकीय सत्य सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या ईश्वरपुरातल्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमातून उघड्यावर आले.
बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पातील ५५६ पुनर्वसित सदनिकांचे आज (१४ ऑगस्ट) वितरण झाले. कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सदनिकांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.