Ajit Pawar : पुष्पक एक्सप्रेस दुर्घटनेला चहावाला जबाबदार, अजित पवारांनी सांगितला पूर्ण घटनाक्रम
पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने गाडीतून खाली उडी मारल्याने कर्नाटक एक्सप्रेसखाली चिरडून 13 जणांचा मृत्यू झाला. या प्रकाराला रेल्वे रसोईतील चहावाला जबाबदार असल्याचे पुढे येत आहे. त्याने आग लागल्याचा ओरडा केल्याने प्रवाशांनी घाबरून उड्या मारल्या.