असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!
असदुद्दीन ओवैसींच्या AIMIM पक्षाला 100 + जागा, ओळखा पुढचा धोका; नुसत्या टोप्या घालून इफ्तार पार्ट्या झोडणाऱ्यांना इशारा!!, हे महाराष्ट्रातले वेगळे राजकीय वास्तव 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढे आले. या निकालामुळे अनेकांनी महाराष्ट्रात मुसलमानांचा राजकीय प्रभाव वाढल्याची भीती व्यक्त केली. पण यामध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांकडून मुसलमान दूर गेले हे राजकीय वास्तव फारसे कुणी स्वीकारले नाही. काँग्रेस, उबाठा शिवसेना या दोन पक्षांना मुसलमान मतदारांनी जोरदार फटका दिला.