Nitesh Rane : आदित्य ठाकरे उद्या बुरखा घालून मॅच पाहणार, नीतेश राणेंचा ठाकरेंवर पलटवार
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे हेच उद्या बुरखा घालून भारत-पाकचा सामना पाहताना दिसतील, असा दावा भाजप नेते तथा कॅबिनेट मंत्री नीतेश राणे यांनी शुक्रवारी केला. त्यांनी यासंबंधी आदित्य ठाकरे यांच्या आवाजाची मिमिक्री करून त्यांची थट्टा उडवण्याचाही प्रयत्न केला. त्यांचा यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.