Abu Azmi : मतांसाठी मराठी-हिंदी वादाला हवा देणारे राजकारण, अबू आझमींचा आरोप
मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता असून तिचा आदर सर्वांनी केला पाहिजे. मात्र काही राजकीय पक्ष केवळ निवडणूक जिंकण्यासाठी मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम वाद निर्माण करून जनतेच्या भावना भडकवत असल्याचा गंभीर आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केला आहे.