• Download App
    बायको आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या Young man commits suicide after being harassed by his wife and in-laws

    बायको आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : बायको व सासरच्या लोकांकडून चारित्र्याच्या संशयावरून होत असलेल्या मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना धनकवडीमध्ये घडली आहे. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी पत्नीसह तिच्या कुटुंबियांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. Young man commits suicide after being harassed by his wife and in-laws

    शरद नरेंद्र भोसले (वय 30, रा. धनकवडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.आत्महत्या करण्यापूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोट पोलिसानी ताब्यात घेतली आहे.

    सहकारनगर पोलिसांनी त्याची पत्नी प्रियांका, तिचा भाऊ मनीष शिंदे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
    शरद आणि त्याची पत्नी प्रियंका यांचे 2018 साली लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या संसारात हस्तक्षेप करण्यास सुरूवात केली होती. त्यांच्या सांगण्यावरून पत्नी घरात भांडण करून त्रास देत होती.

    दरम्यान पत्नी आणि सासरचे लोक त्याच्यावर चारित्र्याचा संशय घेत होते. यावरून त्यांच्यात अनेकदा भांडणे होत होती. त्याचा मेहुणा मनीष याने भांडणे मिटवण्यासाठी शरदला घरी बोलावून मारहाण केली होती. सातत्याने होत असलेल्या या छळाला कंटाळून शरदने 28 ऑगस्ट रोजी राहत्या घरात बेडरूममधील पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    पोलिसांना सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सासू-सासरे बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यावरून तपास करून गुन्हा दाखल करण्यात आला.

    Young man commits suicide after being harassed by his wife and in-laws

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…