• Download App
    लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुखांच्या वकीलांना अटक केली सीबीआयने; अजित पवारांनी रिपोर्ट मागविलाय मुंबई पोलीसांकडून Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's lawyer has been arrested.

    लाचखोरी प्रकरणात अनिल देशमुखांच्या वकीलांना अटक केली सीबीआयने; अजित पवारांनी रिपोर्ट मागविलाय मुंबई पोलीसांकडून

    वृत्तसंस्था

    मुंबई – १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले ठाकरे – पवार सरकारमधील गृहमंत्री अनिल देशमुखांचे आणखी चाळे उघडकीस आले आहेत. आपल्याला क्लीन चिट मिळावी तसेच ती बातमी बाहेर फुटावी यासाठी त्यांनी आपल्या जवळच्या माणसाकरवी सीबीआयच्या अधिकाऱ्याला लाच देऊन फितविले. आता त्या लाचखोर अधिकाऱ्यालाच अटक करण्यात आली आहे. त्याच बरोबर वकील आनंद डागा यांनाही अटक करण्यात आली आहे. दोघांनाही दिल्लीत आणण्यात आले असून त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer has been arrested.

    वकील आनंद डागांना केली आहे, केंद्रीय तपास संस्था सीबीआयने. परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रिपोर्ट मागवलाय मुंबई पोलीसांकडून. सीबीआयचे उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी अभिषेक तिवारी यांना अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांकडून लाच घेतल्यानंतर अटक करण्यात आली. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार अभिषेक तिवारी हा अनिल देशमुखांचे वकील आनंद डागा यांच्या संपर्कात होता.

    अनिल देशमुख यांच्या मुंबईतील निवासस्थानावरून बुधवारी वकिलांनाही ताब्यात घेण्यात आले. सध्या त्याची चौकशी सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. अभिषेक तिवारी आणि आनंद डागा या दोघांना कोर्टात हजर केले जाणार असून त्यांची पुढची चौकशी आणि तपास महाराष्ट्रा बाहेर दिल्लीत होणार आहे.

    याचा अर्थ अनिल देशमुखांच्या १०० कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाबरोबरच हे लाचखोरी प्रकरणही त्यांना गाळात रूतविणारे ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. आणि आता वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याबाबतचा रिपोर्ट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबई पोलीसांकडे मागितला आहे. मुंबई पोलीस आता नेमका कोणता रिपोर्ट अजित पवारांना सादर करतात, यावर महाविकास आघाडीची पुढची चाल अवलंबून आहे.

    अनिल देशमुखांची अटक टाळण्यासाठी ते स्वतः आणि राष्ट्रवादी काँग्रेस भरपूर प्रयत्न करीत आहेत. त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केल्याचा रिपोर्ट मुंबई पोलीसांकडून मागविणे हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.

    Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh’s lawyer has been arrested.

    Related posts

    नुसतीच तोंडी महाराष्ट्र पेटण्याची भाषा, पण शौचालय + साखर घोटाळ्यातल्या शिलेदारांना वाचवण्याची पवारांची का नाही क्षमता??

    सातारा लोकसभेतील उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; अटक होण्याचीही शक्यता

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!