- यास चक्रीवादळामुळे पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेससह पूर्व रेल्वेने २४ मे ते २९ मे दरम्यान २५ रेल्वेगाड्या केल्या रद्द .
- २६ मे रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशासह बांगलादेशच्या किनारपट्टी भागात वादळ येईल. या चक्रीवादळाला ‘यास’ नाव देण्यात आले आहे.Yaas Cyclone Update: PM’s meeting; 13 NDRF troops deployed by airlift; 25 trains including Pune Howrah Express departing from Pune canceled
विशेष प्रतिनिधी
पुणे :बंगालच्या उपसागराच्या पूर्व मध्य भागात कमी-दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, जे तीव्र चक्रीवादळाच्या वादळात बदलण्याची शक्यता आहे. २६ मे रोजी बांगलादेश व्यतिरिक्त पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टी भागात चक्रीवादळ येईल. या चक्रीवादळाला ‘यास’ असे नाव देण्यात आले आहे. ‘यास’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज वरिष्ठ सरकारी अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि दूरसंचार, वीज, नागरी उड्डाण, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या सचिवांशी बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा व इतर मंत्रीही उपस्थित होते.Yaas Cyclone Update: PM’s meeting; 13 NDRF troops deployed by airlift; 25 trains including Pune Howrah Express departing from Pune canceled
चक्रीवादळाच्या वादळामुळे पूर्व रेल्वेने २४ मे ते २९ मे दरम्यान २५ गाड्या रद्द केल्या आहेत. यास चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता पुण्यावरून सुटणारी एक्स्प्रेस गाडी रद.
२५ तारखेला पुण्यावरून सुटणारी पुणे हावडा एक्स्प्रेस केली रद्द.
तर २७ तारखेला हावड्यावरून सुटणारी हावडा पुणे एक्स्प्रेस रद करण्यात आली आहे .मध्य रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयाची माहिती.
प्रवाशांनी पुणे हावडा एक्स्प्रेससाठी प्रवास करण्यासाठी घराबाहेर न पडण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन .यास चक्रीवादळाचा पश्चिम बंगाल आणि ओडीशाला हाय अलर्ट.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने ४६ पथके तैनात केली – पीएमओ
पंतप्रधान म्हणाले की राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाने यापूर्वी ४६ दल तैनात केले आहेत. चक्रिवादळ यासला सामोरे जाण्यासाठी १३ दलांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींची ‘यास’ संदर्भात बैठक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चक्रिवादळ ‘यास’ या संदर्भात वरिष्ठ सरकारी अधिकारी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी आणि दूरसंचार, उर्जा, नागरी उड्डाण आणि पृथ्वी विज्ञान मंत्रालयांच्या सचिवांची बैठक घेतली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा देखील उपस्थित होते .
२६ मे रोजी उत्तर ओडिशा, पश्चिम बंगाल किनारपट्टीवर ‘यास’ चक्रीवादळ येईल