विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार आज दिल्लीत पत्रकारांवर चिडले. त्यांनी पत्रकारांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निघून जाणे पसंत केले. पण शरद पवार पत्रकारांवर चिडतात, हे प्रसंग महाराष्ट्राला काही नवीन नाहीत. पवारांचे चिडण्याचे प्रसंग पुणे, नगरमध्ये पूर्वी घडले आहेत. त्यांना त्यावेळी स्थानिक राजकारणावर प्रश्न विचारेले आवडले नव्हते. नगरमध्ये तर २०१९ मध्ये पत्रकारावर चिडल्याचा प्रसंग ताजा आहे. why sharad pawar gets angry?
त्यावेळी राष्ट्रवादीची पडझड जोरात होती. अनेक नेते राष्ट्रवादी सोडून चालले होते. त्यात पवारांचे नातेवाईक असलेले पद्मसिंह पाटील आणि त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह नुकतेच राष्ट्रवादी सोडून गेले होते. त्यावर नगरमध्ये एका कार्यक्रमानंतर एका पत्रकाराने पवारांना आपले नातेवाईक राष्ट्रवादी का सोडत आहेत, असा प्रश्न विचारला. त्यावर नेते पक्ष सोडत आहेत. कार्यकर्ते नाहीत, असे उत्तर पवारांनी दिले होते. त्यावर आपले नातेवाईक पक्ष सोडत आहेत, असे पत्रकाराने निदर्शनास आणून देताच पवार त्याच्यावर चिडले. why sharad pawar gets angry?
तेथील नेत्यांना त्यांनी पत्रकाराला बाहेर काढण्याची सूचना दिली. बाकीच्या पत्रकारांचीही पंचाईत झाली. शेवटी पवार अशा असभ्य पत्रकारांना बोलवत जाऊ नका आणि त्यांना बोलवणार असाल तर मला बोलवत जाऊ नका, असा त्रागा केला होता.
आज दिल्लीतही पवार अशाच प्रकारे पत्रकारावर चिड़ले. निदान त्याच्या बातम्या तरी तशा आल्या. त्यांना पत्रावरचा प्रश्न विचारलेले आवडले नाही. नंतर पवारांची पत्रकारांवर झालेली चिडचिड बातम्यांचा विषय ठरली. आधी त्यांनी कृषी सुधारणेसंबंधी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर फिरले. त्यावरून राष्ट्रवादीची दोन दिवस गोची झाली होती.
why sharad pawar gets angry?
दस्तुरखुद्द संजय राऊत पवारांच्या पत्रावर खुलासा करायला आले. त्यातून मराठी मीडियाने स्वतःचे समाधान करवून घेतले. पण पवारांना दिल्लीत त्यावर प्रश्न विचारण्यात आले. त्यावर सुरवातीला मुंबई आणि महाराष्ट्रात पवार ज्या स्टाइलने पत्रकारांना “समाधानकारक” उत्तरे देतात त्या स्टाइलने त्यांनी उत्तरे दिली. पण दिल्लीतील पत्रकारांचे प्रश्न थांबलेच नाहीत. त्यामुळे पवार चिडले आणि बातम्या पवारांच्या खुलाशाच्या कमी आणि पवार चिडल्याच्या जास्त झाल्या.
- पण खरेच पवार पत्रकारांवर का चिडत असावेत?
- पवारांना अडचणीत आणणारे प्रश्न विचारलेले चालत नसावेत का?
- पवारांना अनुकूल तेवढेच प्रश्न विचारले जावेत असे त्यांना वाटते का?
- पवार देतील तीच उत्तरे पत्रकारांनी स्वीकारली पाहिजेत, अशी त्यांची अपेक्षा आहे का?
- पवारांची ही भूमिका मूळातच योग्य आहे का?
असे प्रश्न पडल्याशिवाय राहात नाहीत. या प्रश्नांची उत्तरे देणार कोण? आणि तसे प्रश्न महाराष्ट्रात त्यांना विचारणार तरी कोण?