• Download App
    West Bengal: गांधी परिवाराचा आदर्श घेत ममतांचे भाच्याला गिफ्ट ;अभिषेक बॅनर्जींची पदोन्नती;पक्षात नवीन जबाबदारी West Bengal: Mamata's nephew gifted after victory in Bengal; Abhishek Banerjee promoted; New responsibilities in the party

    West Bengal: गांधी परिवाराचा आदर्श घेत ममतांचे भाच्याला गिफ्ट; अभिषेक बॅनर्जी आता राष्ट्रीय सरचिटणीस!

    • तृणमूलच्या सरचिटणीसपदी अभिषेक बॅनर्जी यांची नियुक्ती केली गेली आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी अभिनेत्री सायोनी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता: पश्चिम बंगालमधील विजयानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या सुप्रीमो आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांधी परिवाराचा आदर्श घेत आपल्याच कुटुंबातील सदस्याला प्रमोट केले आहे . त्यांनी भाचा अभिषेकला पदोन्नती दिली आहे. त्यांचे पक्षातील स्थान वाढविण्यात आले आहे. त्यांना तृणमूलचे सरचिटणीस करण्यात आले आहे, तर तृणमूल युवा कॉंग्रेसची जबाबदारी अभिषेक यांच्या जागी सायोनी घोष यांना देण्यात आली आहे. पक्ष प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात शनिवारी झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. West Bengal: Mamata’s nephew gifted after victory in Bengal; Abhishek Banerjee promoted; New responsibilities in the party

    तृणमूलचे नेते कुणाल घोष यांना पक्षाच्या प्रदेश युनिटचे सरचिटणीस करण्यात आले आहे. पक्षाच्या निर्णयांविषयी माहिती देताना ज्येष्ठ नेते पार्थ चटर्जी म्हणाले की, कार्यकारी समितीने निर्णय घेतला आहे की पक्षात एका व्यक्तीचे एकच पद असेल. याला कोअर कमिटीने मान्यता दिली आहे.

    अभिषेक हे ममतांच्या सर्वात विश्वासू लोकांपैकी एक आहेत आणि त्यांनी  विधानसभा निवडणुकीत परिश्रम घेतले. तथापि, अभिषेक यांच्या पक्षात वाढलेल्या हस्तक्षेपामुळे अनेक जुन्या नेत्यांनी तृणमूलला राम राम ठोकला होता .

    या बैठकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे रणनीतिकार असलेले प्रशांत किशोरही उपस्थित होते. बंगाल निवडणुकीत प्रशांत किशोर आणि अभिषेक बॅनर्जी यांनी एकत्र काम केले होते .

    West Bengal: Mamata’s nephew gifted after victory in Bengal; Abhishek Banerjee promoted; New responsibilities in the party

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी