• Download App
    पश्चिम बंगालमध्ये भाजपा २०० पेक्षा जास्त जागा मिळविणार, जे. पी. नड्डा यांचा विश्वास | The Focus India

    पश्चिम बंगालमध्ये भाजपा २०० पेक्षा जास्त जागा मिळविणार, जे. पी. नड्डा यांचा विश्वास

    पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी या असहिष्णु असल्याचा आरोप त्यांच्या राज्यातील भेटीवेळी केला. West Bengal election latest


    विशेष प्रतिनिधी

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा जिंकून सरकार स्थापन करण्याचा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. ममता बॅनर्जी या असहिष्णु असल्याचा आरोप त्यांच्या राज्यातील भेटीवेळी केला. West Bengal election latest

    दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असलेले नड्डा म्हणाले की, सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व इतर पक्षांनी घराणेशाहीचे राजकारण केले पण भाजप हा कुटुंबासारखा पक्ष आहे. शिस्त व सहिष्णुता महत्त्वाची आहे असे श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणत असत. आजच्या परिस्थितीत पश्चिम बंगालला या तत्त्वांची नितांत गरज आहे. कारण ममता बॅनर्जी या असहिष्णु आहेत.

    विविध जिल्ह्यातील नऊ पक्ष कार्यालयांचे उद्घाटन करताना नड्डा म्हणाले की, रबींद्रनाथ टागोर यांनी देशाला एक दृष्टी दिली होती पण आज उलटे चित्र असून पश्चिम बंगालमध्ये असहिष्णुता वाढत आहे, त्याला ममता बॅनर्जी जबाबदार आहेत.

    भाजपाचे मिशन मुंबई : जे. पी. नड्डा घेणार तीन दिवस मॅरेथॉन बैठका

    तृणमूल काँग्रेस अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण करण्यात मश्गुल आहे. २०२१ मध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्यात तृणमूल काँग्रेसला गाशा गुंडाळायला लावून आम्ही दोनशेपेक्षा अधिक जागा जिंकू.

    West Bengal election latest

    आज पश्चिम बंगालची संस्कृती ही हिंसाचार, भ्रष्टाचार व भाईभतीजेगिरीने भरलेली आहे. पूर्वी असे नव्हते. राजस्थानमधील पंचायत राज निवडणुका व बिहारमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. त्यातून ग्रामीण भारतात पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांना मान्यता आहे हे स्पष्ट होत असल्याचे नड्डा यांनी सांगितले.

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…