• Download App
    ममतांच्या "खेला होबे" दिवसाला भाजपच्या 4 केंद्रीय मंत्र्यांचे बंगालमध्ये शहीद यात्रेने प्रत्युत्तर!! West Bengal Chief Minister Mamata Banerjee will play her popular slogan after winning the state

    ममतांच्या “खेला होबे” दिवसाला भाजपच्या 4 केंद्रीय मंत्र्यांचे बंगालमध्ये शहीद यात्रेने प्रत्युत्तर!!

    वृत्तसंस्था 

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्य जिंकल्यानंतर आपली लोकप्रिय घोषणा खेला होबे हिचा वापर देशभर करायचा निर्णय घेतला आहे. 16 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगाल बरोबरच उत्तर प्रदेश, पंजाब, कर्नाटक, हरियाणा, दिल्ली, गुजरात या राज्यांमध्येही खेला होबे दिवस पाळण्यात येणार आहे. ममता बॅनर्जी यांची राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीर करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येईल. तृणमूल काँग्रेसचे खासदार मदन मित्रा यांनी ही घोषणा केली आहे. West Bengal Chief Minister Mamata Banerjee will play her popular slogan after winning the state

    एकीकडे ममता बॅनर्जी या खेला होबे दिवसाच्या निमित्ताने पश्चिम बंगालमधून बाहेर पडून देशभर आपल्या नावाचा डंका वाजवणार असतानाच दुसरीकडे
    भाजपचे 4 केंद्रीय मंत्री मात्र पश्चिम बंगालमध्ये जाऊन शहीद यात्रा काढणार आहेत.



    राज्यातील निवडणुकीदरम्यान 55 भाजप कार्यकर्त्यांची हत्या झाली.या भाजप कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शंतनू ठाकूर, जॉन बार्ला, निशिथ प्रामाणिक आणि सुभाष सरकार हे 4 मंत्री आणि भाजपचे त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते स्वतः जाऊन भेटणार आहेत. त्यांना मदत देणार आहेत. त्याचबरोबर या शहिदांच्या गावातील घरांभोवतीच्या परिसरातील नागरिकांशी विशेष संवाद साधणार आहेत.

    या शहीद यात्रेतून पश्चिम बंगालमधल्या भाजप कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा या चारही मंत्र्यांचा प्रयत्न आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी ही घोषणा केली आहे.

    मोदी सरकार मधले 20 मंत्री 250 हून अधिक लोकसभा मतदारसंघांमध्ये जनसंपर्क यात्रा काढणार आहेतच. परंतु पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या यात्रेला निवडणूक हिंसाचाराचे पार्श्वभूमी आहे. त्यामुळे आक्रमक ममतांना तितकेच आक्रमक उत्तर देण्याचा भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा मनसुबा स्पष्ट दिसतो आहे.

    West Bengal Chief Minister Mamata Banerjee will play her popular slogan after winning the state

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    ठोक भाषण, हाण भाजपची कॉपी; नाशिक मध्ये उबाठा शिवसेना मेळाव्याची “दमदार” कामगिरी!!

    National herald case : गांधी परिवाराचा बचाव करताना कपिल सिब्बल जे बोलले, त्यात एक “तथ्य” निश्चित, पण…